Monday, March 19, 2012

माझं गाण

तुझ्यावर गाणं लिहून
अलगद एका कोऱ्या दुपारी
वाऱ्याच्या झुळकी बरोबर
सोडून दिलं की, मजेने तरंगत
गाणं एखाद्या रंगीबिरंगी
फुलपाखरा सारख भिरभिरत जातं

कुणी एक पहाडी काळ्याशार
पहाडा च्या विशाल कवे मध्ये
ते गाणं आपल्या श्वासात भरून
आसमंत मंत्रमुग्ध करतो


सुरांची चाहूल लागताच
नदीच्या बाहेर सूर मारून
सोनेरी मासळ्या प्राणपणाने
त्याला चुम्बायचा प्रयत्न करतात

ज्या झाडांना स्पर्शून ते जातं
तिथे गोडशी फुलं उमलतात
चमचमणाऱ्या चांदण्या आकाशात
सुरेखशी रांगोळी काढतात

नद्या दर्या पर्वत माणसं या सार्यांना
मोहित करून मग माझं इवलसं गाणं
पहाटे पहाटे हवेच्या झुळकी सरशी
हळूच खिडकीतून परत येतं
आणी शहाण्या सारखं
मनाच्या एका कोपऱ्यात
आठवणींची चादर पांघरून
शांतपणे झोपी जातं .


-सत्यजित खारकर

No comments:

Post a Comment