Monday, March 19, 2012

शापित नट

ही तशी फार पुराणी कथा आहे
एका जटाधारी नटाची व्यथा आहे .
सिनेमा वृत्तपत्राने कोळून कोळून
पिलेली एक पवित्र गाथा आहे !

आभाळातून वीज कोसळताना
कुठल्या झाडावर पडणार
हे तिला सुध्धा ठावूक नसतं
आणि अशा अर्थाचे सुभाषित
संस्कृत मध्ये नक्कीच असतं

आपल्याला कुणी तरी ते
अकारण एकवतं असतं
तेव्हा कळलं कळलं अशी मान डोलवत
जरा exta large आपल्याला हसावं लागतं

रसिकांच्या प्रेमळ परवानगीने
जटाधारी नटाची करुण कथा
सुभाषिता प्रमाणेच आपणास
विषद करून आपणास सांगत आहे
चुकल्या माकल्याची माफी सुध्धा
मनपूर्वक आधीच मागत आहे


मित्रहो ही कविता म्हणजे एक
सळसळत कोसळणारी काळी वीज आहे
एका शापित नटाच्या जीवनातील
फार मोठ्या दुख्खाचे बीज आहे
महाभारताच्या रणांगणावरील
जणू हा एक अभूतपूर्व रथ आहे
रसिकांच्या मनाच्या ज्या फांदी वर
जटाधारीचे कलर फोटो
आनंदाने लटकत होते
त्या फांदी चा हा वध आहे
त्या फांदी चा हा वध आहे
त्या फांदी चा हा वध आहे

टाळ्या शिट्ट्या बद्दल धन्यवाद रसिकहो
पण लक्षात घ्या तीनदा ओळ म्हंटली
म्हणजे कविता काही इथेच संपत नसते
जटाधारींच्या प्रत्येक चित्रपटा प्रमाणे
मध्यंतरा नंतरच खरी कथा सुरु होत असते

ती कथा अशी :
न्याय देण्या साठी एका भामट्याच्या भूमिकेला
जटाधारी ने केस कमी करण्याचा धाडसी निश्चय केला
एकताच बातमी पोरी बाळी मध्ये हा हा कार उडाला
जिकडे तिकडे एकच गलबला झाला

खास अमेरिकेतून एक वारीक पाचारण केला
आखूड व लांब केस कापण्यात तो निष्णात होता
आगावू नट्यांचे केस बोलता बोलता कापणे
हा तर त्याचा रोजचा धंदा होता

एका पवित्र मुहर्ता वर ज्योतिष्याच्या सल्ल्या ने
जटाधारी च्या जटा व बटा इम्पोर्टेड वारीकाने
कात्री ने कित्येक तास खुडूक खुडूक खुडल्या
तासा मागून तास गेले दिवसाची रात्र झाली
जटा काही संपेनात वारीकही जिद्दीस पेटला
खुडता खुडता त्या दोघास ही झोप लागली
वारीकाचा कात्री मात्र चालत राहिला

कालेपर कात्रीच्या अविरत झपाट्याने
हळूहळू बटांच्या रौद्र लाटा ओसरल्या
जालीम अतिरेकी उवा सैरावैरा धावू लागल्या
अख्खा ट्रेनिंग कॅम्प उध्वस्त झाला
म्हणती जटाधारी च्या केसांनी गळा हो कापला
रात्र सरता भुई लगतच्या पिकाची पण कापणी झाली
गुळगुळीत जमिनीची सुध्धा सुपर मशागत झाली

सूर्योदय होता होता एक केस दिशा चुकून
नासिकात शिरला अन जटाधारी ला एक कडक शिंक आली
शिंके च्या प्रतिध्वनीने त्याची त्यालाच मग जाग आली
प्रतिबिंब पाहून महाराजा त्याची पार बोबडीच वळली

सुखद तुषार वर्षाव झाल्याने वारीक ही जागा झाला
भानावर येताच त्याला झाला प्रकार लक्षात आला
त्याने एक भीतीग्रस्त आरोळी ठोकली
आरोळी ती त्याची साता समुद्रा पार गेली
जिकडे तिकडे एकच मग बातमी पसरली
जटाधारी नटाची चुकून चिकणी हंडी झाली
-सत्यजित खारकर

No comments:

Post a Comment