Friday, March 2, 2012

त्रिकोण अर्थात प्रेमाचा

कथा सूत्र :
बंगल्यातल्या डॉली पामेरिअन वर खंडू नामक बेवारस गावरान कुत्र्याचे चे एकतर्फी प्रेम आहे .
डॉली ची मैत्री तिच्या समोरच्या बंगल्यातल्या काळ्या डॉबरमनशी आहे .
(वी. सू. यातील सर्व कुत्री ही काल्पनिक असून यांचा कुठल्याही जीवित अथवा मृत कुत्र्यांशी संबंध नाही)

हिची चाल तुरु तुरु
करते मंजुळ गुरु गुरु
अशी माझ्या वर गोड भुंकली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
हाडके सापडली.

इथं कुणी आस पास ना
गळ्यात साखळीचा फास ना
तू जरा माझ्याशी बोल ना
काळ्या ची संगत सोड ना
तू लगबग जाता
काळ्या वळूनी पाहता
वीज दातात सळसळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात
चड्डी पोस्टमन ची मी फाडली.

हिची चाल तुरु तुरु ...
आख्खी कोंबडी हाणून
माझ्या ही ताटातले खावून
ढेकर मारितो दाबून
चोळीतो हात मी लांबून
हा काळ्या जीवघेणा
साला रेबीजनं मरेना
आता चूक माझी मला कळली
जशी मालकाची गंगी
जशी सदरयाची लुंगी
तशी त्याने ग तुला ठेवली
हिची चाल तुरु तुरु ...

-सत्यजित खारकर

No comments:

Post a Comment