Thursday, March 1, 2012

दिवा

हेलकावे मंद दिवा एकटा अधांतरी
कोण जाणे काय आहे प्रकाशाच्या अंतरी
सूर किर्र अंधारात कुठे जन्मतात ?
गीत आपुल्या जन्माचे कुणा सांगतात ?

किती व्यथा किती कथा
एका आयुष्याच्या
दोन हातांनी पुसायच्या
जखमा कुणा कुणाच्या ?

लढता लढता दिवा लोपला
हळूच बोलली थकली वात
नको चिंता करू माणसा
प्रकाश जन्मतो फक्त अंधारात

-सत्यजीत खारकर

No comments:

Post a Comment